कोंकण

Kokan कोंकण

 कोंकण 




कोंकण ला स्वर्ग का म्हणतात हे तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही येथे याल.इथे येऊन निसर्गाची कलाकारी पाहाल.मी हे सर्व काही सांगतोय कारण मी कोंकण चा आहे.निसर्गाने पूर्णपणे सजवून ठेवलेले हे कोंकण स्वर्ग आहेच पण इथे राहणारी मानस ही एकदम प्रेमळ स्वभावाची असतात. इथे सर्व जाती धर्माचे लोग प्रेमाने राहतात.एकदा का तुम्ही कोकणात आलात की दरवर्षी उन्हाळ्या च्या summer holidays  मध्ये कुठे जायच फिरायला हा तुमचा प्रश्नच मिटून जाईल तुम्ही दरवर्षी कोकणातच येणार फिरायला .कोणालाही आपलंसं करून घेणार हे कोंकण आणि कोकणातील मानस तुम्हाला  एव्हड प्रेम देतील की दरवर्षी उन्हाळ्यात फिरायला कोकणातच.

  कोंकणात फिरायला काय आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तो प्रश्न विचारूच नका कारण कोंकणात एव्हडी फिरण्यासारखी ठिकाण आहेत ना की जर कोणी सांगायला सुरुवात केली तर तो सांगत राहील आनि तुम्ही ऐकत, कोंकण हे असं ठिकाण आहे जिथे फिरायला येण्यासाठी कधी जायचं कोणता महिना फिरण्यासाठी चांगला असतो..हे पण तुम्ही विचारू नका वर्षाच्या बाराही महिने कोंकण च सौन्दर्य उठुनच दिसत असत पण पावसाळ्यात  त्या पावसाच्या थेंबानी कोंकण अजून सजून जात..

कोकणातली तशी सगळीच माणस शिक्षित आहेत कोकणातल्या माणसांना मराठी, हिंदी, मालवणी, English,कोंकणी ह्या सर्व भाषा येतात त्यामुळे तुम्हाला संवादासाठी काही त्रास होणार नाही. आणि कोंकणी माणूस तुम्हाला मालवणी दोन दिवसात आरामात शिकवून टाकेल... आणि मग तुम्हीच तुमच्या आई बाबांना पुढच्या वर्षी उन्हाळच्या सुट्टीत बोलाल (गे आये bag भर कोंकणात फिराक जावचा असा देवगडचो beach गार्डन पवनचक्के मालवणातले माशे सावंतवाडीचो राजवडो आणि बाकी सगळा बघूचा असा)

आणि मग तुमची आई बोलेल(मेल्या थयच जावचा हा फिराक).

  कोकणातले non-veg जेवन अरे एकदा खाल ना तर माका दे माका दे बोलत राहाल.fry केलेले ताजे माशे, गरम गरम मटण आता नाही सांगू शकत तोंडाला पाणी सुटलय.इथली night life कशी असते हा पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना इथली night life म्हणजे disco dj वाली नाही..घरी जेवायचं पोट भरून रात्री मग जायचं beach वर ice-cream किंवा chinese  घेऊन यायचं आणि खायचं त्या beach वरच्या थंड हवेत बसून जुन्या आठवणीनंवर गप्पा मारत.

 अस हे स्वर्ग कोंकण मग काय ठरवलंत येताय  ना कोकणला याच एकदातरी   

येवा कोंकण आपलाच असा.....


Writer

Sagar Sawant


© BindaZz. All rights reserved. Distributed by ASThemesWorld