ZoyaPatel
Ahmedabad

भारतमाता

 






भारतमाते



तुझ्यासाठी काहीतरी करावं

करावं काहीतरी तुझ्यासाठी।

कर्ज फेडावे तुझे हे भारतमाते

प्राण देऊनी देशासाठी।।


काय सांगू तुला, किती आनंद होतोय मला

किती नशीबवान मी

माझा जन्म तुझ्या मातीत झाला।

त्या विरजवानांच्या कथा ऐकल्या

जे देशासाठी लढले विसरून मृत्यूच्या भीतीला

मला ही संधी मिळावी तुझी सेवा करण्यासाठी।।१।।

कर्ज फेडावे हे भारतमाते

प्राण देऊनी देशासाठी


सलाम करतोय त्या स्वातंत्र्यवीरांना

स्वातंत्र्यवीरांना करतोय सलाम त्या।

काय शौर्य होत त्या वीरांमध्ये

सहन केल्या गुलामीतल्या नरक यातना त्या।

मला ही त्यांच्यासारखं शौर्य दाखवायचय

शौर्य दाखवायचय देशासाठी।।२।।

कर्ज फेडावे हे भारतमाते

प्राण देऊनी देशासाठी


सेवा करुनि तुझी मजला

पुत्राच कर्तव्य निभवायचय 

सगळ्या देशवासियांना एकच हे सांगायचंय

बंधू-भाव कायम ठेवून

देशप्रेम अजून वाढवायचय

आपल्या देशाच्या समृद्धीसाठी।।३।।

कर्ज फेडावे हे भारतमाते

प्राण देऊनी देशासाठी




लेखक- सागर सावंत


Mumbai
Kolkata
Bangalore
Previous Post Next Post