MAzAK
सोहम आणि Caroline ची लहानपणसूनच मैत्रीचं नात होत राहुल मूळचा indian महाराष्ट्रातला त्याचे वडील मोठे buisnessman ते France मध्ये Buisness मुळे settle झाले होते. पण एवढ्या लांब आपल्या देशापासून राहूनही ते आपली भारतीय संस्कृती विसरले नव्हते... ते France मध्येही भारतीय संस्कृती प्रमाणे निर्मळ पणाने राहत सगळ्यांची मदत करत त्यामुळे ते आणि त्यांचा मुलगाही तेथे सगळ्यांचे आवडते बनले होते..
सोहम आणि Caroline ची मैत्री आता प्रेमात बदललेली होती त्यांच्या प्रेमाबद्दल सोहम च्या बाबांना माहीत होतं पण Caroline च्या आईवडिलांना माहीत नव्हतं.आता त्यांच्या प्रेमाच्या गोष्टी पूर्ण Lyon city मध्ये पसरायला लागल्या होत्या. आता ही बातमी Caroline च्या बाबांनाही कळली होती त्यांनी ह्या गोष्टीचा विरोध केला आणि Carolineला सोहम ला परत कधीही न भेटण्याची ताकीद दिली पण तरीही ती दोघ भेटायची आणि हे Caroline च्या वडलांना अजिबात आवडत नव्हतं ,आणि ही गोष्ट सोहम आणि Caroline ने सोहम च्या वडिलांना सांगितली सोहम च्या वडिलांनी सोहम ला सांगितलं की तू सध्या माझ्या पैश्यांवर जगतोयस ह्या कारणावरून Caroline च्या वडिलांना तू आवडत नसशील तू स्वतः काहीतरी कमव आणि मग त्यांच्याकडे जा लग्नाची बात करायला...
1 वर्ष सोहम खूप मेहनत करतो खूप पैसे कमवतो buisnessman ना आणि Carolineच्या घरी जातो..तरीपण Caroline चे बाबा लग्नाला नकार देतात सोहम हे सर्व त्याच्या बाबांना जाऊन सांगतो..ह्या वेळी सोहम चे बाबा Caroline च्या वडिलांना सरळ विचारतात तुमचा problem काय आहे..माझ्या मुलग्यात काय कमी आहे.. Caroline चे वडील सांगतात तुमचा मुलगा चांगला आहे पण मी लग्नाला मंजुरी देत नाही आहे कारण तुम्ही indian आहात आणि तुम्ही कधीना कधीतरी भारतात जाणार आणि तिथे माझी मुलगी दुसर्यादेशाची आहे म्हणून तुमच्या माणसांनी माझ्या मुलीला त्रास दिला तर छळ केला तर हे माझ्या problem चे कारण आहे..सोहम चे बाबा सांगतात हे तुम्हाला कोणी सांगितलं ,Caroline च्या बाबांनी सांगितलं TV मध्ये पाहिलं लोकांकडून ऐकलं... सोहम चे बाबा सांगतात अरे हाच तुमचा problem आहे ह्या सर्व गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवता... अतिथी देवो भव: म्हणून पाहुण्यांनाही देव मानणारी आमची जनता आमच्या भारताची मानस अशी नाहीच आहेत हे सर्व तर आम्हाला बदनाम करण्यासाठी केलं जातंय... हे सर्व ऐकून Caroline च्या बाबांचे डोळे उघडले आणि त्यांनी सोहम आणि Caroline च्या लग्नाला मंजुरी दिली.... पण त्याच रात्री Caroline च्या बाबांना विचार आला आपल्या मित्राची मुलगी Natalie तीच लग्नही एका भारतीयाशी झालय आणि ती भारतातच राहते तिला phone करून विचारुया...
Caroline चे बाबा Natalie ला phone करतात आणि आधी सारी लग्नाची गोष्ट सांगतात आणि मग तू तिथे आनंदात आहेस का विचारतात..Natalie सांगते अरे काका इथे माझा हे लोक खूप छळ करतात सासू सासरे खूप छळतात नवराही दररोज मारतो नरक यातना सहन करतेय मी इथे..
हे बोलल्यानंतर Natalie आजून काहीतरी बोलत असते पण तेव्हड्यात Caroline च्या बाबनच्या हातून mobile खाली पडतो . त्यांना धक्काच बसतो ते लगेच Caroline ला बोलवतात आणि सांगतात तुझं परवाच लग्न करून टाकणार माझ्या मित्राच्या मुलाबरोबर हे ऐकून Caroline ला धक्का बसतो ती काहीतरी बोलत असते पण तिचे बाबा तिला काही बोलूच देत नाही...त्याच रात्री मग Caroline गाडी घेऊन बाहेर पडते आणि परत घरीच येत नाही येते तर तिच्या मृत्यूची बातमी आणि त्याबरोबर सोहम ही Caroline च्या मृत्यूची बातमी ऐकून Heart Attack ने मरण पावला होता.....ह्या गोष्टीला 7 दिवस होतात आणि Natalie आणि त्याचे सासू सासरे तिचा नवरा सगळे Caroline च्या घरी येतात Caroline चे बाबा दुःखी आणि हतबल अवस्थेत बसलेले असतात..Natalie विचारते काय काका मुलीचं लग्न आहे आणि तुम्ही दुःखी, काही काळजी करू नका तुमची मुलगी india त जाऊन खूप सुखी असेल मलाच बघा सासू सासरे आई-वडिलांपेक्षाही जास्त प्रेम करतात आणि तिथे भारतातली सर्व माणसही खूप प्रेमळ आहेत...हे ऐकून Caroline च्या बाबांना परत एकदा धक्का बसला त्यांनी विचारलं मग तू जे phone वर जे सांगितलंस ते..
Natalie ने सांगितलं
वो तो मैंने मजाक किया था।