ZoyaPatel
Ahmedabad

दाजी मामा

 दाजी मामा


 दाजी मामा चांगल्या मनाचा मुलांसाठी हृदयात खूप सारी जागा ठेवणारा माणूस.मी लहानपणापासून त्याला बघतोय कोणाच्या भांडणात नाही तंट्यात नाही.माझी आणि त्याची ओळख मी 7 वर्षाचा असताना खेळाच्या मैदानात झाली.

  आम्ही सारे मित्र संध्याकाळी अभ्यासामुळे आलेला आळस व आई-बाबांची ओरडणी खाऊन कंटाळलेल्या मनाला थोडासा विश्राम देण्यासाठी मैदानात  क्रिकेट अथवा विविध खेळ खेळण्यासाठी येत असू.तेव्हा दाजी मामा आपल्या गायींना चरवण्यासाठी मैदानाच्या बाजूला असणाऱ्या बागेत आणत असे.

 तो आपल्या गायींना तेथे चरवण्यासाठी ठेवून आमच्या इथे आमचा खेळ बघण्यासाठी येत असे.येताना विविध प्रकारचे चोकॉलेट्स आरोग्यदायी खाऊ जसे फळे,दुधानपासून बनलेले पदार्थ आणत असे.आणि आम्हाला देत असे खाऊ देण्याच्या आधी स्वतःच हाथ धुवून आम्हालाही हाथ धुतल्यानन्तर खाऊ खायला देत असे.

 आमच्या मनात त्याची चांगली प्रतिमा बनली होती अधूनमधून आम्हाला खेळून-खेळून कंटाळा आला की दाजी मामा आम्हाला चांगल्या व मस्त अश्या गोष्टी सांगत असे.आणि आम्ही त्याच्या गोष्टीत एव्हडे रमून जात असू .की अंधार कधी पडला हे समजायचंच नाही.मग तोच आम्हाला सांगायचा ‘अरे मेल्यानु अंधार पडलो आवस बापुस हाक मारूक लागात घराक जावा’.

आता आम्ही मोठे झालो ज्या माणसाच्या गोष्टी ऐकण्यासाठी आम्ही संध्याकाळची वाट बघत असु.ती अभ्यास करण्यात व T.V.बघण्यात कधी निघून जातो समजतच नाही.व कधीतरी ह्या जीवनात मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळाला की दाजी मामा आठवतो व त्याच्यासोबत घालवलेला आनंददायी वेळ आठवतो.अजूनही ते मैदान तसेच तसेच आहे.तेथे येणार दाजीमामा तसाच आहे.पण हरवलंय ते ते आमचं आनंदी मन जे तेथे रमत असे.

Thanks Teli sir inspired me to create this story.and thanks to Bandekar sir.

                     Writer 

             Sagar D. Sawant 

Mumbai
Kolkata
Bangalore
Previous Post Next Post