ZoyaPatel
Ahmedabad

धर्म आणी Duty

 धर्म आणि duty




सदर लेखाचा उद्देश माझे स्वतःचे धर्माविषयी असलेले माझे विचार मांडण्याचा आहे.ह्यात सादर केलेली माहिती माझ्या काही वैचारिक मतभेद असलेल्या मित्रांसोबत ह्या वैचारिक गोष्टीवर विचार करून मग त्या गोष्टीमध्ये काय सत्य असू शकेल ह्या गोष्टीचा अंदाज लावण्यात आला आहे. तुम्हाला ह्या बद्दल कोणताही आक्षेप असेल तर कळवा अन्यथा सोडून द्या...


नास्तिक आणि Athiest 

सद्यस्थितीत नास्तिक ह्या शब्दाचे वर्णन English भाषेत Athiest असे केले जाते पण ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगळा आहे.


*नास्तिक: ह्या शब्दाचा अर्थ भारतीय तत्वज्ञानानुसार असा होतो की अशी व्यक्ती जी वेदांना प्रमुख ज्ञानाचे स्त्रोत मानत नाही.


*Atheist: ह्या शब्दाचा अर्थ असा आहे. अशी व्यक्ती जी देवाच्या अस्तित्वाला मानत नाही.


नास्तिक आणि अधर्मी 

सद्यस्थितीत काहि लोक नास्तिक ह्या शब्दाला चुकीचं मानतात आणि communist विचारधारा असणाऱ्या लोकांना नास्तिक म्हणून संबोधित केले जाते.

पण नास्तिक आणि आस्तिक ह्यात चांगल आणि वाईट अस काही नाही.


*जे वेदांना ज्ञानाचा प्राथमिक स्त्रोत मानतात ते आस्तिक.

*जे वेदांना ज्ञानाचा प्राथमिक स्त्रोत मानत नाहीत ते नास्तिक.


काही वेळाने आस्तिक philosophy ला म्हणजे वेदांना ज्ञानाचे प्राथमिक स्त्रोत मानणाऱ्या philosophy ला Hindu Philosophy म्हणायला लागले.


तर नास्तिक philosophy ला follow करणारे Religion निर्माण झाले.



ह्या chart वरून तुम्ही Indian Philosophy बद्दल जाणून घेवू शकता.


Imp...



•ह्या पूर्ण chart मध्ये नास्तिक प्रकारातील charavaka ची philosophy फक्त अधार्मिक आहे. जी philosophy धर्म,

कर्म, आणि मोक्ष ह्या गोष्टींना मानत नाही.

ह्याच कारणास्तव नास्तिक sect मधिल बौद्ध आणि जैन विचारवंतांनी charvaka च्या विचारांचा विरोध केला.


Charvaka 

Charvaka ने आत्म्याच्या Existance ला विरोध केला,पुनर्जन्माचा देखील विरोध केला.जे आपल्याला दिसत ते सत्य आहे आणि तेच न्यानाचे स्त्रोत आहे अस मानले.


धार्मिक: धार्मिक माणुस म्हणजे असा माणुस जो धर्माचे पालन करतो . आणि धर्म म्हणजे एक विशिष्ट नियमाने केलेले सत्कर्म.

आई बाबांची सेवा म्हणजे धर्म.


आणि ह्या धर्माचे आचरण करणारी व्यक्ती म्हणजे धार्मिक व्यक्ती.

आणि ह्या गोष्टीसाठी देवाला ति व्यक्ती मानते आहे किंवा नाही ह्या गोष्टीचा फरक पडत नाही.


जर कोणतीही व्यक्ती आपले कार्य चांगल्या गोष्टीसाठी आणि प्रामाणिकपणे करत असेल तर ति व्य्क्ती धार्मिक

उदा. 



एखादा athiest विचारसारणीचा communist नेता आपल्या पदाचा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळुन जनतेची सेवा करत असेल तर तो athiest नेता धार्मिक आहे.


ह्या उलट 


एक right wing political party चा नेता जो देवाला मानतो देवाची पुजा करतो पन आपल्या पदाचा गैरवापर करत असेल आणि प्रत्येक समाजाला त्रास देत असेल तर ति व्यक्ती अधर्मी समजली जाईल.


धर्म: धर्म म्हणजे Duty 

आई बाबांची सेवा करणे म्हणजे धर्म.

सैनिकाने देशाचे रक्षण करणे म्हणजे धर्म.

नागरिकांनी देशहित पाहणे म्हणजे धर्म.


धर्माबद्द्ल माझा विचार हा की धर्म म्हणजे असे 

कर्म जे करणे माणसाला बन्धनकारक आहेत स्व:हितासाठी आणि बाकीच्यांच्या देखील.


भारतिय तत्वज्ञान इतिहास 

माझ्या दृष्टीन भारतिय तत्वज्ञान हे त्या काळातील आणि सध्यस्तिथीतील सर्वोच्च तत्वज्ञान होत.


पन काही चुकिच्या Perception मुळे आणि काही लोकांच्या चुकिंच्या वैचारिकतेमुळे,आणि जनतेच्या संपलेल्या विचारशक्तीमुळे ह्या चांगल्या तत्वज्ञानाचा उपयोग वाईट गोष्टी साठी केला गेला.


उदा. मासिक पाळी 



महिलेच्या मासिकपाळीवेळी तिला तेव्हाच्या काळी ,हे समजून की ति महिला ह्या दिवसात मानसिक दृष्ट्या आणि शारिरीक दृष्ट्या त्रास सहन करत असेल म्हणून त्या मासिक पाळीच्या चार दिवसांसाठी तिला प्रत्येक कार्यातून मुक्त केल गेल .

पन सद्यस्तिथीत हे सांगायला नको की मासिक पाळीला कोणत्या दृष्टीन पाहण्यात येत, सद्यपरिस्थितीत महिलांना सांगितल जात तुम्ही जेवन बनवू नाही शकत पन भांडी घासू शकता.


सुवेर:

ह्यात सुवेर तेव्हा होतो जेव्हा एखाद्याच्या घरी बाळ जन्माला येत. तेव्हा 12 दिवस त्या घरी खुप पथ्य पाळली जातात आणि त्या काळात कोणिही बाहेरचा व्य्क्ती त्या घरी येत नाही आणि घरचा व्य्क्ती बाहेर सहसा जात नाही.


Logic: ह्या ठिकानी मला हे logic वाटतय की नविन infant baby ला बाहेरच्या विश्वातून कोणताही आजार संक्रमित होवू नये म्हणून सुवेर ही संकल्पना आली असावी


सुतक:

हे तेव्हा होत जेव्हा एखाद्याच्या घरातील व्य्क्ती मरण पावते ह्यात 13 दिवस त्या घरातील व्यक्तिंना वेगळ ठेवल जात आणि त्यांच्या घरी अन्न ग्रहण देखील केल जात नाही.


Logic: ह्यात मला हे logic वाटत की एखाद्याचा मृत्यू जर कोणत्याही अश्या आजाराने झाला आहे जो की संक्रमित होत असेल, तो संक्रमित न व्हावा हा त्यामागचा ऊद्देश


अस प्र्त्येक माणसाने आपल्या प्रत्येक धार्मिक गोष्टीमागे logic शोधल तर आपली philos ophy आपल्याच माणसाना लवकर समजेल.


माझा देव 

मला विचारायला गेल तू देवाला मानतो का, तर हो मी देवाला मानतो. पन माझा दृष्टीकोन देवासाठी वेगळा आहे. मी माझ्या चुकीचा गुन्हेगार स्वत:ला ठरवतो आणि यशाचा शिल्पकार ही स्वत:ला समजतो.


मग देव का हवा

तर देव हवा चित्तशांततेसाठी,आपल्या मनातील लाखो विचारांना संपवण्यची ताकद श्री व्यंकटेश स्तोत्रात आहे.


देव आहे किंवा नाही हा मुळी प्रश्नच असू नये काही वेळेस देवाची भिती असणे चांगलेच.


मी देवाला मानव तर का आणि मानू नये तर का हा प्रश्न मनी असावा.


आपल्या भारतिय विचारधारेनुसार तरी देव आणि परमात्मा ह्यात फरक असलेला दिसतो.


परमात्मा ही philosphycal गोष्ट आहे जी की प्र्त्येकात आहे आणि त्यामूळे आपन प्रत्येकाचा आदर केला पाहिजे.


तर धर्म आणि religion ह्या दोन शब्दात खुप मोठा diffrence आहे. भारतिय philosophy मध्ये तुम्ही कोणत्याही देवाला मानू शकता नाही मानल तरी काही नाही, पन religion मध्ये जे आहे ते तुम्हाला मानावाच लागत.


त्यामुळे मी स्व्तःला एक आस्तिक,धार्मिक आणि irreligious म्हणेन.


●इथे मी आस्तिक आहे कारन मी वेदांना ज्ञानाचे स्त्रोत मानतो 

●इथे मी धार्मिक आहे कारन मी धर्माचे sanskar सोबत पालन करतो 

●आणि मी Irreligious आहे कारन मी कोणत्याही पंथाचे आचरण करत नाही.


Imp ...

Religion ह्या शब्दाचे मराठीत वर्णन एक पंथ म्हणून होवू शकेल.


Disclaimer:

I know the limits of freedom of speech in India .


This Was Written By 

Sagar D. Sawant

For Queries 

sagarsawant3207@gmail.com


Reference:

 Wikipedia 

World History Encyclopaedia 

Brittanica 

Internet Encyclopaedia For Philosophy 



Mumbai
Kolkata
Bangalore
Previous Post Next Post