दुःखी बाप
काही Privacy related problems मुळे Original नाव
बदललेली आहेत.
एक असा माणूस जो खूप सार दुःख असतानाही आनंदी राहत असतो.एक असा माणूस जो खूप सारे अश्रू असतानाही ते लपवून फक्त हसत असतो तो माणूस म्हणजे बाप.
आपण आईचा विचार करतो पण बापाचा कधीच करत नाही.कारण बाप आपल्यावर ओरडतो पण तो का ओरडला हे आपल्याला समजत नाही आणि आपण त्याच्याबरोबर दुष्मनी करून बसतो.आणि जो पर्यंत त्याच्या ओरडन्याचे कारण समजते तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.
आज मी माझ्या बाबांन बद्दल सांगणार आहे.
माझे बाबा आता खूप आनंदात आहेत अस मी बोलू शकत नाही कारण प्रत्येक बाप हा कायम Tension मध्येच असतो.पण त्यावेळीपेक्षा Better आहेत असं बोलेन.
माझ्या बाबांनी खूप जणांना मदत केली. त्यांना हसवल पण त्यांना हसवण्यात ते कधी स्वतः हसलेच नाहीत.माझ्या बाबांनी खूप हालाकीचे दिवस काढलेयत. वयाच्या सतराव्या वर्षा पासून कामाला लागले आणि तेव्हापासून आतापर्यंत ते फक्त दुसऱ्यांसाठीच जगतायत स्वतःसाठी ते कधीच जगले नाहीत.बाकीचे मुलगे life enjoy करत होते तेव्हा माझे बाबा घर चालवत होते.हुशार असूनही फक्त पैसे नसल्यामुळे पूर्ण life खराब झाली बाबांची.एव्हढं होऊनही ते गप नाही राहिले खूप काम केलं पैसे कमावले आणि मग लग्नाचा विचार केला.
लग्न झालं. देवाने जीवनात खूप त्रास दिला पण बायको चांगल्या स्वभावाची दिली म्हणून बाबा खूप खुश झाले.बाबा खुश राहू लागले.आणि त्यांची खुशी वाढवण्यासाठी मग मी जनमलो बाबा खूप खुश झालं एव्हडे की ते देवा चे रोज खूप आभार मानत.मग माझा भाऊ जन्माला आला तेव्हा माझी आई बाबांना बोलली की ‛आपण दोघ यात्रेला जाऊ तेव्हा तुमच्या हातात सुदन आणि माझ्या हातात मनीष अशी आपण चौघ जत्रेत चालत जाऊ.’आनंदी आयुष्य चालू होतं बाबांचं .
पण आता एव्हड चांगलं जीवन बघून मग देवाचीच नजर लागली आणि माझी आई अचानक रात्री आजारी पडली बाबांनी शहरातल्या डॉक्टर कडे नेलं त्याने सांगितलं इथे काही इलाज होणार नाही. हिला इथून पुढे न्यावं लागेल बाबा नि होकार दिला पुढे हलवण्यासाठी सफर चालु झालं Ambulance मधला. मग आईला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला मग बाबांनी आईला गाव ते शहर पूर्ण सफरात तोंडानेच श्वास दिला.
हॉस्पिटल मध्ये बाबा आईला घेऊन पोहोचले आईला ADMIT केलं.आई अजून शुद्धीत होती तिने बाबांचा हात पकडला व बाबांना सांगितलं ‛मी गेल्यावर माझ्या मुलांना तुम्ही दुःख नाही देणार मला माहित आहे.पन त्यांना आईची कमी जाणवू देऊ नका.’बाबा बोलले ‛तुला काही होणार नाही.आणि तू अस का बोलतेयस मी तुला काही होऊ देणार नाही’ असं बोलून जो माणूस जीवनात कधी रडला नाही तो ICU च्या बाहेर येऊन (शब्द नाहीत माझ्याकडे).अश्या परिस्थितीत पण त्यांनी हिम्मत सोडली नाही त्यांनी घरी phone केला आणि आजीला सांगितलं की सुदन ला देवासमोर गारान्ह घालायला सांग.मी छोटा मला काय माहीत मी देवासमोर नारळ ठेवून ‛माझ्या आईला बाप्पा बर कर रे अस सांगितलं.’आणि थोड्या वेळाने माझ्या बाबांचा phone आला ‛घाबरू नका ती जरा बरी झालीय’.
घरातल्यानं बर वाटलं.सगळे थोड्यावेळासाठी आनंदी झाले. बाबा ICU मध्ये आईच्या बाजूलाच बसलेले आईने बाबांकडे आनंदाने बघितलं.आणि बाबांकडे बघत राहिली.बाबांनी आईकडे बघून ‛तुला काही नाही होणार मी आहे’असं दाखवलं.मग डॉक्टरांनी बाबांना थोडी औषध MEDICAL मधून आणायला सांगितली.बाबांनी राजू दादाला आई बरोबर ठेवून औषध आणायला गेले.
औषधे घेतली आणि Hospital मध्ये आले.तेव्हड्यात राजू दादा ICU मधून धावून आला आणी बाबांना सांगितलं ‛दादा काळजी घेऊ नको वहिनी बरी झाली सगळी मशीन्स बंद पडले वाजत होते ते.’
बाबांनी औषधे तिथेच टाकली आणि आईजवळ धावत गेले. आई शेवटी बाबांना जिथे बघत होती तिथेच बघत बघत तिने जीव सोडला.
मी पन हे लिहताना भावुक झालो होतो so काही चूक झाली तर Sorry.
Writer
सागर सावंत
...........To Be Continue
Read part 2
आईचा मृत्यू झालेला पाहून बाबांना खुपमोठा धक्का बसला तरीही राजूदादाला त्यांनी सांगितलं ‘राजू तुझी वहिनी आता नाही राहिली’ राजू दादाला हे वाक्य ऐकून डोळ्यात एव्हडे अश्रू आले की तो icu मधून बाहेर जाऊन देवासमोर ‘का देवा’? अस बोलून रडू लागला.
तेव्हड्यात Doctor ने बाबांना येऊन सांगितलं ‛लवकरात लवकर death body ला हलवून icu खाली करा’.बाबांनी doctor पाशी थोडा वेळ मागितला doctor नि सांगितलं ‛लवकरात लवकर काय ते करा’. बाबांनी बाहेर जाऊन एक ambulance बोलवून घेतली.आता death body ला उचलण्यासाठी अजून एका माणसाची गरज होती.बाबांनी hospital मध्ये प्रत्येक माणसाजवळ request केली पण कोणीही death body ला हात लावण्यासाठी तयार झालं नाही.राजू दादाने सांगितलं ‛दादा ह्या लोकांकडे नको मदत मागूस मी उचलतो’. तेव्हड्यात एक साधारण 50 वर्षांचे काका तिथे आले आणि त्यांनी बाबांना विचारलं ‛काय झालं’?..बाबांनी झालेली सारी घटना सांगितली.त्या व्यक्तीने सांगितल ‛माझ्या मुली सारखी आहे ती आपण दोघांनी उचलून तिला ठेवूया ambulance मध्ये’. बाबांनी व त्या काकांनी मिळून आईच्या death body ला icu मधून ambulance पर्यंत नेऊन सोडलं.
आता आईच्या death body वर घालण्यासाठी चादर नव्हती त्या वेळी रात्रीचे 2 वाजले होते आणि दुकान उघडी नसणार म्हणून बाबांचे एक आईकडचे नातेवाईक त्या शहरात राहत होते बाबांनी त्यांना सर्व घटना सांगितली व एक चादर आणायला सांगितली.
बाबांनी वाट बघितली पण तो नातेवाईक ना body उचलायला आला नाही चादर द्यायला..बाबांनी त्या रात्री दोन वाजता त्या 50 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाच्या मदतीने एक दुकान शोधलं आणि चादर विकत घेतली. आता ambulance चालू झाली बाबा पुढे बसलेले आणि तो छोटासा राजू दादा death body सोबत पाठी बसलेला.
Death body घेऊन राजू दादा आणि बाबा गावात पोहोचले पुढे रवी दादाने एकट्याने आणि राजू दादा आणि बाबांनी पाठी धरून deathbody घरी आणून ठेवली सारे नातेवाईक घरी पोहोचले होते सारे रडत होते मला बाजूच्या घरी ठेवलं होतं. स्वतःच्या बहिणीप्रमाणे मानणारे,आईप्रमाणे मानणारे,लेकीप्रमाणे मानणारे ते लोक आपले अश्रू सांभाळू शकत नव्हते.खूप प्रेम करायचे ते आईवर..
स्मशान घाटावरून सारे घरी आले ज्याप्रमाणे आई सासरी सगळ्याची आवडती होती तशीच ती माहेरीही सर्वांची आवडती होती.. आईच्या माहेरचे लोकपण खूप दुःखात होते आणि ह्या दुःखी मनोअवस्थेचा फायदा घेऊन काही दृष्ट लोकांनी त्यांच्या मनात भरवलं की आईला बाबांनी मारलं आणि ते लोक ह्या गोष्टीला सत्य समजून बसले.. जो व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त आपल्या जीवणसांगिनीशी प्रेम करत होता जो व्यक्ती तिला साधं दुखातही बघू शकत नव्हता तो व्यक्ती त्याच्या मनात हा विचार कसा येऊ शकतो. ह्याचा त्यांनी विचारच केला नाही.
बाबा depression मध्ये गेले आणि एकदा sucide हा पर्यायही निवडला पण त्यांच्या मनात आईला दिलेले वचन आठवलं जे आईने बाबांकडून घेतलं होतं की ‛मी जर मरण पावले तर तुम्ही माझ्या मुलांना माझ्यापेक्षाही जास्त प्रेम करणार’...
बाबा स्वतःशी लढले परत एकदा चेहऱ्यावर एक गोडशी smile घेऊन जगू लागले.family कडुन mental support मिळाला देवाकडून परत लढण्याची ताकद.
देवाने दिलेल्या दुःखाच्या वेळेत जर लढून त्या दुःखा सोबत युद्ध जिंकलो तर मग आनंदाची वेळ चालू होते आणि आता आनंदाची वेळ चालू आहे सर्वकाही ठीक आहे. आई जरी जगासाठी गेली असली तरी बाबांच्या मनात कायम जिवंत राहील.
ही story पूर्णपणे काल्पनिक आहे मला फक्त एक गोष्ट सांगायची होती ह्या story मधून की दुःख येतच राहत कधीतर अस होईल की एवढं दुःख त्रास वाढेल की तुम्ही जगण्यासाठी वाईट गोष्टींचा आधार घ्याल like Alcohole,Drugs etc किंवा sucide करून जीवनच संपवून टाकाल.
पण दुःख का येत काहीतरी गोष्ट आपल्याला न मिळाल्यास अथवा साथ सुटल्यास,पण श्री कृष्ण ह्यांच उदाहरण घ्या लहानपणीच त्यांची आईबाबांसोबतची साथ सुटली खुपसार दुःख आलं पण ते एक smile ठेवून जगले आपणही श्री कृष्ण प्रमाणे प्रत्येक दुःखाशी लढून खोट्या क्षणिक सुखाला त्यागून आनंदी जीवन जगावे.कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते आपला दृष्टिकोन सर्वकाही ठरवतो .
धन्यवाद
राधे राधे
Written By.
Sagar Sawant