Who Am I

Who Am I

 




मृत्यू काय शब्द आहे ना बोलायला किती सोप्पा पण practicaly ह्या दोन शब्दांविषयी लोकांना बोलायला आवडत नाही पण हे सत्य आहे. 

  आता इथे वाचायला आलेली लोक म्हणजे जी negative energy ला मानणारी आहेत, नाहीतर कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवणारी.


आत्मा(Soul) आता आत्मा म्हणजे काय तर हिंदू धर्मानुसार आत्मा एक energy आहे जी शरीराला चालवते आणि शरीर नशवर आहे पण आत्मा नाही कारण आत्मा अमर आहे.. आता हे कसं वाटत ऐकायला मस्त ना पण कोणाला विश्वास बसत नाही जे ह्या गोष्टीला खोट समजतात त्यांनी पुढे वाचू नका....

 तर माझ्या मते आत्मा एक form of energy आहे.आणि त्या energy ला अनुभवण्यासाठी माणसाला त्या energy ला अनुभवण्याचा लायक बनवायला हवं .आणि आत्मा अमर आहे ,जर आत्मा form of energy आहे म्हणजे आत्मा अमरच आहे because Energy can be changed from one form to another, but it cannot be created or destroyed.




 लहानपणी म्हणजे 5th ला मला शिकवलं गेलं की आपला brain एक computer आहे आणि आपल्याला जर हात उचलायचा असेल तर सगळ्यात आधी messege brain पर्यंत जातो brain process करतो आणि मग तो messege हातपर्यंत जाऊन हात उचलला जातो.. पण मला एक समजलं नाही मला हात उचलायचा आहे हा मी विचार केला आणि brain ने ते काम perform करण्यासाठी मदत केली..पण विचार मी केला मग मी मी कोण आहे..brain एक computer आहे तर मी त्याचा operator मग मी कोण आहे ? मग मी त्या आत्मा ह्या गोष्टीला एक theory च्या रूपात consider केलं because त्या theory शिवाय बाकी कोणतीही गोष्ट माझं answer देण्यासाठी सक्षम नव्हती.



  

मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं आणि अजूनही हवं आहे..आत्मा नसते negative energy नसते अस तुम्ही बोलता मग ही गोष्ट असणे शक्यच नाही असा काही पुरावा आहे का तुमच्याकडे तुम्ही बोलाल आत्मा दिसत नाही, अरे blackhole पण दिसत नव्हते त्याचा पहिला photo हाती मिळेपर्यंत त्या blackhole ला   theoretical गोष्ट समजले जात होते... black matter दिसत नाही आपण त्याच्या असण्याचा अंदाज घेऊ शकत नाही पण तो present आहे ना.

  एखाद्या गोष्टीला ती गोष्ट आहे की नाही हे न जाणून घेता  ती नाहीच ती गोष्ट present असूच शकत नाही हे बोलणं तुम्हाला चुकीचं वाटत नाही का?...



NASA ने एक Golden Disk Universe मध्ये पाठवली आहे त्यात पृथ्वीवरील जैवविविधतेचे photos विविध गाण्यांच्या प्रकारांच्या आवाजांचे records आणि आपल्या पृथ्वीवरील cultural heritage त्यात आहे..ती disk पाठवलेली का आहे? कारण आहे ती disk alien च्या हाती लागेल व ते पृथ्वीवर येतील alien ला कोणी पाहिले आहे का नाही but एक आशा ते असू शकतात  ....मग negative energy आत्मा असू शकत नाही का?


ह्या blog चा part2 लवकरच......

©Sagar Sawant

  



© BindaZz. All rights reserved. Distributed by ASThemesWorld