एका शहरात एका रस्त्याच्या बाजूला एक माणूस रोज संध्याकाळी उभा असायचा,हसत रहायचा स्वतःशीच बोलायचाआनि जाताना त्या रस्त्याला हात लावून डोळे बंद करून काहीतरी विचार करून निघून जायचा. सर्व लोक त्याला मूर्ख म्हणायची, त्याला बघून हसायची, पण तो कोणाकडे लक्षच देत नव्हता तो स्वतःच्याच विचारात रमलेला असायचा.
एकदा संध्याकाळी शाळा सुटल्यावर एका मुलाने त्यांना पाहिलं आणि आपल्या बाबांना विचारलं सर हे कोण आणि हे असे का हसतायत बाबांनी सांगितलं मला एव्हढं माहीत नाही पण हे एक श्रीमंत व्यक्ती होते.पण मग असे मूर्ख झाले,मुलाने विचारलं मूर्ख कसे झाले? बाबांनी प्रश्नाच उत्तरच दिलं नाही.
असाच तो मुलगा दररोज त्या मूर्ख माणसाकडे पाहायचा आणि निरीक्षण करायचा.
एके दिवशी तो मुलगा शाळेतून रडत रडत बाहेर येत होता तेव्हा त्याचे बाबा रडायचं नाही रडू नकोस हे सांगत होते.तेव्हा त्या मूर्ख माणसाची नजर त्या रडण्याच्या आवाजाकडे गेली तो मूर्ख माणूस त्याच्या बाबांना सांगू लागला रडू द्या त्याला.आनि त्या मुलाला सांगू लागला रड मोठ्याने रड तो मुलगा मोठ्याने रडू लागला जसा तो मोठ्याने रडू लागला तसा हा मूर्ख माणूस त्या मुलाला बघून मोठ्याने हसू लागला.
सगळी लोक त्याच्याकडे बघू लागली.त्या मुलाच्या बाबांनी त्या मूर्ख माणसाला बाजूला ढकललं आणि मुलाला गाडीत बसवून निघून गेले.तो मूर्ख माणूस तो मुलगा गेल्यानन्तरही हसत होता.
तो मुलगा घरी आल्यावर बाबांना म्हणाला बाबा ते काका मला रडताना बघून हसले का? त्या मुलाच्या बाबांनी सांगितलं ते मूर्ख आंहेत..मग त्या मुलाने सांगितलं बाबा आज मी खुश आहे.आज मी मनसोक्त रडलो.
मग कित्येक दिवस झाले तो मुलगा रोज त्या मूर्ख माणसाला बघायचा. तो मूर्ख माणूस दररोज तसाच यायचा हसायचा.
एके दिवशी शाळा सुटल्यानंतर त्या मुलाने दरवेळी प्रमाणे रस्त्याच्या बाजूला बघितलं तर आज तो मूर्ख माणूस त्याला दिसला नाही.त्या मुलग्याने लगेच त्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या दुकानदाराला विचारलं 'ते आजोबा दररोज इथे यायचे ते कुठे गेले'.दुकानदाराने सांगितलं 'त्यांची तब्येत खराब झाली त्यांना एका चांगल्या व्यक्तीने hospital मध्ये admit केलं'.
तो मुलगा त्याच दिवशी लगेच hospital मध्ये गेला.त्या hospital मध्ये तो मूर्ख माणूस bed वर पडलेला होता.त्या मुलाने त्या मूर्ख माणसाला जाऊन विचारले.‛मी रडत असताना सगळे चूप रहायला सांगतात तुम्ही मला अजून मोठयाने का रडायला सांगितलं आणि मला रडताना पाहून तुम्ही हसत का होता’?. मूर्ख माणूस म्हणाला ‛कारण मी मूर्ख आहे’.तो मुलगा सांगतो ‛मला माहित आहे तुम्ही काहीतरी लपवताय’.तो मूर्ख माणूस सांगतो तुला कस कळलं.मुलगा सांगतो ‛मीही सर्वकाही लपवून ठेवलेलं ते त्या दिवशी अश्रूंच्या रुपात निघून गेल’...तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा नाहीतर नको
तो मूर्ख माणूस सांगू लागतो
‛त्या दिवशी माझ्या मुलीचा वाढदिवस होता मी खूप खुश होतो माझ्या मुलीचा वाढदिवस. तिला घेऊन मी आणि माझी बायको shoping साठी आलेलो माझी मुलगी खूप खुश होती.मी तिला कायम हसताना बघायचो त्या दिवशी तर ती खूप खुश होती हसत होती मीही खूप खुश होतो.
त्या रस्त्याच्या बाजूला आम्ही तिघ bus ची वाट बघत होतो.मला एका माणसाचा phone आला मि फ़ोन वर बोलायला गेलो phone उचलनार तेव्हड्यात एक जोराचा आवाज आला पाठी वळून बघितलं तर.
माझं आयुष्य संपलं होत माझी मुली आणि बायको रस्त्यावर पडलेले होते.माझ्या मुलीचा एक हात तुटलेला होता शरीराच्या प्रत्येक ठिकाणांहून रक्त येत होतं पण डोळ्यात अश्रू नव्हते तिने माझ्याकडे बघितलं आणि निघून गेली सोडून मला.’
हे ऐकून तो मुलगा बोलला मग तुम्ही खूप रडला असाल ना?
मूर्ख माणूस बोलला ‛नाही अजिबात नाही.’
मुलगा बोलला ‛तुम्ही मूर्ख कसे बनलात ह्या कारणामुळे का.’
मूर्ख माणूस बोलला ‛लोकांना मी मूर्ख वाटतोय पण मी मूर्ख नाही आहे मी त्या वेळेत अडकून पडलोय एका पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखा ,पिंजऱ्याच्या बाहेर आठवण नावाचा टाळ आहे आणि अश्रू नावाची चावी.’
मुलगा बोलतो ‛मग तुम्ही अश्रू नावाच्या चाविचा वापर करून एकदा रडून परत आयुष्य का चालू करत नाही.’
मूर्ख माणूस बोलतो ‛पिंजऱ्याच्या बाहेर मला जायचच नाही आहे.मला आकाशात उंच उडण्यासाठी जे पंख मला ताकद देत होते ते पंखच राहिले नाहीत. आणि मी माझ्या त्या पंखाच्या आठवणी सोबत ठेवून असाच पिंजऱ्यात मरण्याची वाट बघतोय मला अश्रू नावाची चावी वापरायचीच नाही आहे.’
मुलगा बोलतो ‛पण त्या पंखाना म्हणजे तुमच्या मुलीला तुम्ही विसरण्याचा प्रयत्न केला नाही का.’
मूर्ख माणूस बोलला ‛नाही जर त्या दिवशी माझी मुलगी रडली असती तर तिला बघून मीही रडलो असतो आणि सगळं विसरलं असतो. पण ती रडत नव्हती तिच्या मनात समाधान होते की मला माझे बाबा काहीही झालं तरी वाचवणार तिच्या चेहऱ्यावर ते सहज दिसू शकत होत.पण मी तिला वाचवू शकलो नाही.’
आणि मूर्ख माणूस बोलला ‛thank you तुझ्या बाबांनी मला hospital मध्ये admit केलं आता मी अजून काही दिवस ह्या पिंजऱ्यात राहीन..’
मुलगा काही बोलला नाही आणि चालत घरी गेला.
आणि घरी गेल्यावर बाबांना विचारलं ‛बाबा तुम्ही किती चांगले आहात तुम्ही त्या मूर्ख माणसाला वाचवलं.’
बाबांनी मुलाला सांगितलं
‛मूर्ख ते नव्हते मूर्ख मी होतो असे ते बोलले आनि रडू लागले’.
असे ते बोलले कारण
2 महिन्यानपूर्वीच त्यांची पत्नी वारली होती तेव्हा ते रडले होते पण तो मुलगा रडला नव्हता पण रोज रात्री तो रडायचा.कधी तो मुलगा रडायला गेला की त्याचे बाबा त्याला रडू नकोस असे सांगायचे.
पण त्या दिवशी त्याला त्याच्या आईबद्दल एक त्याच्यावर्गतला मुलगा काहीतरी बोलला तो रडतही होता पण त्याच्या बाबांनी त्याला चूप रहायला सांगितलं पण त्या मूर्ख माणसांमुळे तो मनसोक्त रडला आणि कितिदिवसानंतर सुखाची झोप घेऊ शकला.
काही वेळेस काही गोष्टी विसरून जाणे कठीण असते पण त्या गोष्टी विसरणे गरजेचे असते नाहीतर आपली life त्या वेळेत अडकून राहते आणि लोक मूर्ख समजायला लागतात...
आणि एक गोष्ट एका वेळेच्या पिंजऱ्यात अडकून पडलेले लोक मूर्ख असतात की त्यांना समजू न शकणारे आपण ..
Listen On Spotify