ZoyaPatel
Ahmedabad

आई

 या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायला शब्द अपुरे पडतील अस बोलून गेलो तर ते खरच असेल , आ आणि ई हे दोन स्वर मराठी भाषेतले, आणि हे एकत्र येऊन एक असा शब्द बनवतात  ज्या शब्दामुळे प्रत्येकाच अस्तित्व आहे आणि अस्तित्व टिकून आहे, पहिली मैत्रीण, पहिली अशी व्यक्ती जिचं ओरडणं पण खूप आवडून येत , डोळ्यांमधले अश्रू आपण आपल्या रुमालाने पुसू शकतो पण त्या डोळ्यातल्या अश्रूंना थांबवण्याची ताकद फक्त आईच्या साडीच्या पदरात असते...

  आई म्हणजे आपला वकीलच नव्हे का काहीही चूक होऊदे defend करनार पहिल व्यक्तिमत्व म्हणजे आई , काही वेळेस अनवधानाने , रागाने तिला पण काही बोलून जातो पण आपल्या लेकावर येतो का कधी राग त्या मातेला , नुसती धडपड स्वतःला विसरून फक्त मुलाची काळजी , मुलगा घरी नाही आला असेल तर तिच्या मनात चाललेला तो विचाराचा गोंधळ , स्वतः साठी कधी डोळ्यात अश्रू नाही दिसत तिच्या पण एक छोटा काटा जरी लागला मुलाला तर तिचं मन जास्त अस्वस्थ होत आणि तिच्या त्या डोळ्यात अश्रू दिसून येतात , तिचे ते अश्रू तिच्या मुलाला मग खर प्रेम समजवून जातात.. काटकसर करणारी ती रखुमाई  स्वतः साठी काही विकत घ्यायच्या आधी शंभर वेळा विचार करते पण मुलाला काही हवं असेल तर काटकसर विसरून जाते तिच्यासाठी मुलाच्या चेहऱ्यावर येणार हास्याच सर्वोत्परी आहे ...

आपण काही आणि कसेही बनलो असलो परिस्थितीने आपल्याला काहीही बनवल असो त्या मानवी स्वरूपातल्या परमेश्वरा समोर आपण फक्त जस जन्माला आलो तस जातो , तिला अश्रू नाही दिसले तरीही तिला सार समजून येत ती आई आहे ,ना पण तिला समजून घेता येत नाही ना , तिला बोलावंस वाटत  ना,  तू कशी आहेस ना अस कोणी कस  अस असू शकत,

 ती कधी कधी खूप आजारी असते पण स्वतःची काळजी शून्य त्या तापात देखील घरातली सर्व काम करते पण जेव्हा तीच मूल आजारी असत तेव्हा अख्ख घर डोक्यावर घेते... सद्यस्थितीत खूप त्रास असतो प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात पण आईने मायेने हाथ डोक्यावरून फिरवला की त्रास म्हणजे काय हे विसरून जायला होत.. सगळे आईला  देवाचा अवतार म्हणतात देवासोबत तुलना  करतात पण मला वाटत देव असेल चांगला पण आई ही आई आहे आणि ती फक्त आई आहे ...


एक inccident मी असा पहिला की एका महिलेच मूल दिव्यांग होत आणि त्या मुलाला काही समजून येत नव्हत पण तिची ती आई त्या मुलाला पूर्णतः सांभाळत होती आणि तिच्या चेहऱ्यावर असा कोणता भाव नव्हता त्रासाचा वैगेरे नाही तिच्या मनात त्या मुलाबद्दल ओझ होत की कायम ह्याला सांभाळावं लागेल ... ह्या विश्वात काही खूपच  मौल्यवान असेल ना एखाद्या मुलासाठी तर ती म्हणजे आई ...


So मला समजलेलं प्रेम म्हणजे आईच प्रेम जे सर्वात जास्त निरागस असत ती पण expectations ठेवते मुलांकडून की माझं मूल अस व्हावं तस व्हावं पण तस नाही झालं तरीही ती कायम सोबत असते तिच्यासारखं बनण शक्य नाही पण अस बनण्याचा प्रयत्न तर कराव की आईसारखा स्वभाव बनवा...


Mumbai
Kolkata
Bangalore
Previous Post Next Post