दुःखी बाप part 1
काही Privacy related problems मुळे Original नाव
बदललेली आहेत.
एक असा माणूस जो खूप सार दुःख असतानाही आनंदी राहत असतो.एक असा माणूस जो खूप सारे अश्रू असतानाही ते लपवून फक्त हसत असतो तो माणूस म्हणजे बाप.
आपण आईचा विचार करतो पण बापाचा कधीच करत नाही.कारण बाप आपल्यावर ओरडतो पण तो का ओरडला हे आपल्याला समजत नाही आणि आपण त्याच्याबरोबर दुष्मनी करून बसतो.आणि जो पर्यंत त्याच्या ओरडन्याचे कारण समजते तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.
आज मी माझ्या बाबांन बद्दल सांगणार आहे.
माझे बाबा आता खूप आनंदात आहेत अस मी बोलू शकत नाही कारण प्रत्येक बाप हा कायम Tension मध्येच असतो.पण त्यावेळीपेक्षा Better आहेत असं बोलेन.
माझ्या बाबांनी खूप जणांना मदत केली. त्यांना हसवल पण त्यांना हसवण्यात ते कधी स्वतः हसलेच नाहीत.माझ्या बाबांनी खूप हालाकीचे दिवस काढलेयत. वयाच्या सतराव्या वर्षा पासून कामाला लागले आणि तेव्हापासून आतापर्यंत ते फक्त दुसऱ्यांसाठीच जगतायत स्वतःसाठी ते कधीच जगले नाहीत.बाकीचे मुलगे life enjoy करत होते तेव्हा माझे बाबा घर चालवत होते.हुशार असूनही फक्त पैसे नसल्यामुळे पूर्ण life खराब झाली बाबांची.एव्हढं होऊनही ते गप नाही राहिले खूप काम केलं पैसे कमावले आणि मग लग्नाचा विचार केला.
लग्न झालं. देवाने जीवनात खूप त्रास दिला पण बायको चांगल्या स्वभावाची दिली म्हणून बाबा खूप खुश झाले.बाबा खुश राहू लागले.आणि त्यांची खुशी वाढवण्यासाठी मग मी जनमलो बाबा खूप खुश झालं एव्हडे की ते देवा चे रोज खूप आभार मानत.मग माझा भाऊ जन्माला आला तेव्हा माझी आई बाबांना बोलली की ‛आपण दोघ यात्रेला जाऊ तेव्हा तुमच्या हातात सुदन आणि माझ्या हातात मनीष अशी आपण चौघ जत्रेत चालत जाऊ.’आनंदी आयुष्य चालू होतं बाबांचं .
पण आता एव्हड चांगलं जीवन बघून मग देवाचीच नजर लागली आणि माझी आई अचानक रात्री आजारी पडली बाबांनी शहरातल्या डॉक्टर कडे नेलं त्याने सांगितलं इथे काही इलाज होणार नाही. हिला इथून पुढे न्यावं लागेल बाबा नि होकार दिला पुढे हलवण्यासाठी सफर चालु झालं Ambulance मधला. मग आईला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला मग बाबांनी आईला गाव ते कणकवली पूर्ण सफरात तोंडानेच श्वास दिला.
हॉस्पिटल मध्ये बाबा आईला घेऊन पोहोचले आईला ADMIT केलं.आई अजून शुद्धीत होती तिने बाबांचा हात पकडला व बाबांना सांगितलं ‛मी गेल्यावर माझ्या मुलांना तुम्ही दुःख नाही देणार मला माहित आहे.पन त्यांना आईची कमी जाणवू देऊ नका.’बाबा बोलले ‛तुला काही होणार नाही.आणि तू अस का बोलतेयस मी तुला काही होऊ देणार नाही’ असं बोलून जो माणूस जीवनात कधी रडला नाही तो ICU च्या बाहेर येऊन (शब्द नाहीत माझ्याकडे).अश्या परिस्थितीत पण त्यांनी हिम्मत सोडली नाही त्यांनी घरी phone केला आणि आजीला सांगितलं की सुदन ला देवासमोर गारान्ह घालायला सांग.मी छोटा मला काय माहीत मी देवासमोर नारळ ठेवून ‛माझ्या आईला बाप्पा बर कर रे अस सांगितलं.’आणि थोड्या वेळाने माझ्या बाबांचा phone आला ‛घाबरू नका ती जरा बरी झालीय’.
घरातल्यानं बर वाटलं.सगळे थोड्यावेळासाठी आनंदी झाले. बाबा ICU मध्ये आईच्या बाजूलाच बसलेले आईने बाबांकडे आनंदाने बघितलं.आणि बाबांकडे बघत राहिली.बाबांनी आईकडे बघून ‛तुला काही नाही होणार मी आहे’असं दाखवलं.मग डॉक्टरांनी बाबांना थोडी औषध MEDICAL मधून आणायला सांगितली.बाबांनी राजू दादाला आई बरोबर ठेवून औषध आणायला गेले.
औषधे घेतली आणि Hospital मध्ये आले.तेव्हड्यात राजू दादा ICU मधून धावून आला आणी बाबांना सांगितलं ‛दादा काळजी घेऊ नको वहिनी बरी झाली सगळी मशीन्स बंद पडले वाजत होते ते.’
बाबांनी औषधे तिथेच टाकली आणि आईजवळ धावत गेले. आई शेवटी बाबांना जिथे बघत होती तिथेच बघत बघत तिने जीव सोडला.
मी पन हे लिहताना भावुक झालो होतो so काही चूक झाली तर Sorry.
Writer
सागर सावंत
...........To Be Continue
Read part 2