आजोबा मि तुम्हाला खुप miss करतो.कुठे आहात तुम्ही मि तुम्हाला कधी बघितल नाही आहे.पन आजी आणि पप्पा सांगत असतात.आजोबा असते ना तुझे तर तुझ्यावर एव्हड प्रेम केलं असतना ,की आम्हला तुझ्यावर साधं ओरडायला पण दिल नसत.
गावातले लोक पण मला तुमच्या नावाने ओळखतात,आणि सांगतात‛तुझे आजोबा म्हणजे देवमाणूस जर असते ना आता तर खूप प्रेम केलं असत तुझ्यावर.’
आजोबा खूप आठवण येते ओ तुमची, पण आजी सांगते तुम्ही देवाघरी गेलाय आणि परत येणार नाही,मी पण आजीला सांगितल आजोबा नाही येणार तर मी जातो आजोबांना भेटायला देवाघरी.तर आजी मला ओरडली आणि सांगितलं परत अस बोलायचं नाही.तुम्ही का येणार नाही ओ आजोबा माझ्यावर चिडलाय का तुम्ही.आणि तुम्ही देवाघरी का गेलाय. तुमची मला खूप आठवण येते.आजीने सांगितलं तू जन्माला यायच्या एक महिन्या आधी तुझे आजोबा देवाघरी गेले.
का आजोबा तुम्ही गेलात तुम्ही असता तर माझ्यावर ओरडायला कोणाला दिल नसत.म्हणजे मी ह्या माझ्या पूर्ण आयुष्यात तुमच प्रेम कधीच पाहू शकणार नाही का.
माझ्यावर आता सगळे प्रेम करतात.पण तुमचं प्रेम अनोखंच असत.
तुम्ही देवाघरी गेला नसता तर मी तुमच्यासोबत खूप खेळलो असतो तुम्ही माझे लाड पुरवले असते.संध्याकाळी आपण गावात फिरायला गेलो असतो. पण हे सर्व माझं स्वप्नच बनून राहणार कारण तुम्ही काय येणार नाही.
मी तुमच्यावर खूप नाराज आहे.
पण असुदे फुडच्या जन्मी please तुम्ही माझेच आजोबा बना पन मी जन्माला यायच्या आधी please देवाघरी जाऊ नका....
तुमचा नातू
सागर