आठवणी खूप साऱ्या असतात हसवणाऱ्या, रडवणाऱ्या पण काही आठवणी अश्या असतात ज्या खूप हसवतात ही कारण ज्याची आठवण येते ती व्यक्ती हसवत असते आपल्याला कायम, आणि खूप दुःख ही होत कारण ती व्यक्ती आपली असते आणि ती व्यक्ती आपल्याला परत कधीच भेटणार नाही हे आपल्याला माहीत असत...त्या व्यक्तीसोबत आपल्याला जोडून ठेवते ती म्हणजे त्या व्यक्ती कडून मिळालेलं प्रेम आणि कुठलतरी Gift
ही story काहीशी तशीच
आज काहीसं घरात वातावरण संतापलेलं होत कारण होत ते म्हणजे एक अंगठी च म्हनजेच ring च... सुदन खूप चिडला होता त्याच्या आई-बाबानवर....त्याच्या आई-बाबांनी त्याची अंगठी आणि त्याची सोन्याची chain सोनाराला देऊन मोठी chain बनवायला सांगितली होती.....
बाबा- अरे एक अंगठीसाठी कश्याला रडतोयस दोन तीन अजून घेऊन देऊया तुला..
सुदन-नाही मला तीच अंगठी हवी आहे मला तीच अंगठी हवी आहे...
आई-अरे आता ती अंगठी नाही मिळू शकत आतापर्यंत त्याची chain पण झाली असेल मोठी वाली.. ती देणार ना तुला वाढदिवसाला...
सुदन-मला वाढदिवस वैगरे काही साजरा नाही करायचाय
आई-अरे पण.....
सुदन--मी जातोय माझी अंगठी घेऊन यायला...
बाबा--अरे पण आता पर्यंत त्यांचं दुकान बंद झाल असेल आता वाजले किती...
सुदन -काय तुम्ही बंद नाही मिळणार सांगताय..मी शोधणार आणि मला ती अंगठी भेटणारच.
बाबा-ok बघूया प्रयत्न करून.....
आई बाबा व सुदन अंगठी शोधण्यासाठी बाहेर पडतात दुकानात जातात पण दुकान बंद झालेल असत....
आई-चला बंद आहे दुकान जाऊया घरी
सुदन रुसलेला चेहरा घेऊन चालू लागतो पण बाबांना त्याच्या त्या अंगठी सोबत जुडलेल्या भावना समजतात आणि सुदनला सांगतात की इथून जवळच त्या सोनारांच घर आहे...सुदन बाबांकडून पत्ता घेतो आणि आईबाबांना घरी जायला सांगतो...आणि स्वतः मित्राला बोलावतो आणि त्या सोनारानच्या घरी जायला निघतो...पण अर्ध्या रस्त्यावरच त्याच्या मित्राची गाडी बंद पडते...
सुदनचा मित्र - आता काय..
सुदन- काय काय आता चालत जाऊया
सुदनचा मित्र-अरे खुळा झालंयस का रात्रीचे दोन वाजलेयत आणि आपण चालत जायचं..
सुदन--ok मी जातो तू रहा इथेच
सुदनचा मित्र--मी पण येतो आता नाहीतर इथे एकटा मला भूत पकडतील
सुदन-Ok
दोघे चालत चालत सोनाराच्या घरी पोहोचतात....
Dore bell वाजवतात सोनार लगेचच दरवाजा उघडतो
सोनार-मला माहीतच होत तुम्ही येणार ते पण तुम्ही एव्हडा वेळ कसा लावला
सुदन-तुम्हाला कस माहीत की आम्ही येणार ?
सोनार-ही घे अंगठी पण हे सांग तुला ही अंगठी एव्हडी का गरजेची आहे...
सुदन- ती अंगठी माझ्या मैत्रिणीने दिलेली खूप गोड स्वभाव होता तिचा.. माझे खूप मित्र होते खूप मैत्रिणी होत्या पन ती खास होती ती सगळ्यांपासून वेगळी होती..तिच्या आवडी म्हणजे अनाथ आश्रमात जाऊन अनाथ मुलांन सोबत खूप सार बोलणे.... प्रत्येकाला मदत करत असायची तिला Doctor।बनून सगळ्यांची सेवा करायची होती....सगळ्यांची लाडकी होती ती पण...
मित्र, सोनार- पण काय..
सुदन-पण तिच्या मदत करण्याच्या स्वभावामुळेच तिचा जीव गेला...
मित्र-कसा😢
सुदन- रस्त्यावर चालणाऱ्या एका छोट्या मुलाला अपघातातून वाचवत असताना हिचा अपघात झाला... मी पोहोचलो तेव्हा ही Hospital मध्ये होती....मी खूप ओरडलो तिला....पण तिने काहीही न बोलता हसत हसत ही अंगठी मला दिली आणि बोलली काळजी घेऊ नको तुझ्या हृदयात कायम मी असेन....म्हणूंन मला ही अंगठी खूप महत्त्वाची आहे त्या सोबत माझ्या आठवणी जुडलेल्या आहेत...
सोनार--अरे पण ह्या आठवणींना थोडं विसरून जावं ह्या आठवणी विसरता येत नाही पण विसरून जाव्यात....
सुदन-- तुम्हाला बोलणं सोप्प आहे पन ह्या आठवणी ती वेळ विसरन सोप्प थोडी आहे....तुम्ही विसरू शकला असता....
सोनार-- तू 4 वर्ष तिच्यासोबत राहून एव्हड्या आठवणी आठवणी करतोयस.... माझी तर ती मुलगी होती मी लहानपणापासून तिला प्रेमाने संभाळलेलं लाडकी होती ती माझी मला दुःख झाल नसणार....
पण मला तिने तुझ्याबद्दल सांगितलेल तू किती चांगला आहेस आणि तुझं पुढचं आयुष्यही चांगलं व्हावं म्हणून मी तुला सर्व काही विसरायला सांगतोय.... तू जून सर्वकाही विसर आणि नवीन सुरवात कर आणि एक succesful माणूस बन मग माझी मुली जिथे कुठे पण असेल ती खुश होईल.....
Enjoy This Life
BindaZz