ZoyaPatel
Ahmedabad

मराठीचे संवर्धन

 आज मी माझ्या मातृभाषे बद्दल बोलणार आहे... प्रथमतः मी कोणत्याही भाषेला कमी लेखत नाही किंवा कमी समजत नाही मी फक्त इतर भाषांचा आदर करतो , कारण मी महाराष्ट्रात राहतो ...


तर पहिला प्रश्न असा की मराठी माणूस एव्हढा मराठी भाषेसाठी व्याकुळ का असतो , तर south India मध्ये Major आक्रमण झाली नाहीत, कारण महाराष्ट्रात मराठी माणसं तलवार घेऊन उभी होती , तर south India च्या माणसांना आपली संस्कृती ,आपली मंदिर आपली भाषा जपण्यासाठी as compare to राजपूत, अहोम आणि मराठा तेव्हडा संघर्ष करावा लागला नाही , तरी देखील त्यांचं त्यांच्या भाषेवर प्रेम किती आहे आपली संस्कृती त्यांनी कशी टिकवली आहे,

मग मराठ्यांनी तर आमच्या भाषेसाठी आमच्या संस्कृती साठी किती मोठा संघर्ष केला , even पानिपत च्या लढाई मध्ये जेव्हा कोण सोबतीला नव्हत तेव्हा ह्या हिंदुस्थानला परकीय आक्रमणापासून वाचवण्यासाठी एक अख्खी तरुण पिढी गमवून बसवणारा मराठी माणूसच ना , मग मराठी चा गर्व नको का, मुघलांकडून हिंदूचे हाल होत होते तेव्हा महाराष्ट्राने शिवाजी महाराज दिले आणि जेव्हा आपल्याच माणसांचे हाल आपल्याच माणसांनी केले तेव्हा महाराष्ट्राने dr. बाबासाहेब आंबेडकर दिले,


हिंदी आहे चांगली भाषा , पण जे ह्या भाषेची बळजबरीने सक्ती करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना सांगावस वाटत तुमची भाषण हिंदी मध्ये नव्हे उर्दू मध्ये होती, शुद्ध हिंदी ह्या north Indians ना समजणार आहे का, त्यांना कधी त्याचंच नाही समजत म्हणून UP aani bihar च्या लोकांना कायम लढवत ठेवून सत्तेचा उपभोग घेतला जातो, आणि हे आता महाराष्ट्रात होतय , सर्वप्रथम निर्लज्ज बोलावस वाटत तरुण कार्यकर्त्यांना ज्यांना मिळत काही नाही आणि साहेबांच्या चरणावर मस्तक ठेवून असतात , काही वयाने मोठी मानस, वयाने छोट्या नेत्याच्या पाया पडतात, मग समजायला लागलं समजूतदार आणि जास्त शिकलेला मराठी माणूस देश का सोडायला लागला आहे.


नेत्यांचे तळवे चाटणारा युवा असावा महाराष्ट्राचा, की त्यांना प्रश्न विचारणारा, तळवे चाटुन 1500 मिळतील ते देखील मताचे , प्रश्न विचारलात तर सद्यस्थितीत जेल मध्ये जाल राहुद्या तळवेच चाटा, 

मला कोणत्याही राजकीय पक्षाचा problem नाही प्रश्न आहे जनतेचा ज्यांनी त्यांना डोक्यावर ठेवलय अरे नेता नोकर आहे तुमचा तुम्ही त्याचे गुलाम नाहीत साहेब साहेब करत फिरत असता ते , ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने मान झुकवली ती पण सन्मासाठी ती देखील शिवरायांन समोर...आणि आता?


मराठी भाषा बनली महाराष्ट्रीयन प्राकृत पासून ज्यात संगम आहे मगधी आणि शौर्यसेणी प्राकृत चा...मराठी भाषेला समृद्ध बनवल आपल्या संतानी , मला एकच समाज सर्वाधिक आवडतो आणि तो म्हणजे वारकरी समाज जो सर्वसमावेशक आहे, अंधश्रद्धेचा विरोध करणारा ,तरी देखील महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मुलन कायदा आणला गेला 


Continue...

Mumbai
Kolkata
Bangalore
Previous Post Next Post