आठवतो तो दिवस नाना ने दुपारी आपल्यासोबत एक पांढऱ्या रंगाचा बोका आणला होता. छोटस पिल्लू होत ते मियाव मियाव ओरडत होत.नाना खूप खुश होता.मग नानाने त्या बोक्याला घरात आणलं. नानाच्या घरात गर्दी जमली सगळे लोग त्या छोटयाशा मांजराच्या पिल्लाला बघायला जमले होते.
मस्त होत ते मांजरीच पिल्लू नाना दिवसभर एकटा असायचा घरात, काकी कामाला जायची आणि ताई म्हणजे नानाची मुलगी मुंबई ला कामाला होती. नाना दिवसभर एकटा असायचा बागेत काम करत माड म्हणजे नारळाच्या झाडांना पाणी घालत. नाही कोणाशी बोलायचा ना खुश दिसायचा..
पण त्याने ते मांजरीच पिल्लू आनल्यापासून त्याच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारची चमक आली होती.
1 वर्ष झालं,नानाने त्या बोक्याला म्हणजे मांजरीच्या पिल्लाला खूप प्रेमाने मोठं केलं होतं.
तो बोकाही आता मोठा झाला होता. पण तो फक्त नाना बरोबरच राहायचा नाना झाडांना पाणी घालायला गेला की हा ही नानाच्या पाठीमागून चालला,नाना आंब्याचा बागेत फिरायला गेला की हा ही जाणार ऐटीत फिरायला पण कोण दुसरा माणूस त्याच्या जवळही गेला तरी तो नानाच्या बाजूला जाऊन लपत होता.
आणि नाना दररोज सकाळी नारळ विकायला शहरात जायचा तो देवगडातून येईपर्यंत हा घरात बसून राहायचा.
कारण नाना दररोज नारळ विकले जावोत की नको बोक्यासाठी माशे जरूर आणायचा.आणी तसा बोकाही नानावर खूप प्रेम करत होता. नानाने सांगितलं ‛बाबू आज माशे गावक नाय ही तुझ्या आवशींन वांग्याची भाजी केल्यानं हा खाशील ना’. बोक्याला जणू नानाची भाषा समजतच होती. तो लगेच ती वांग्याची भाजी खात होता.
नाना आता त्या बोक्याला आपला मुलगाच मानत होता एव्हड प्रेम करत होता तो.
एके दिवशी असाच नाना माडाच्या झाडावर नारळ काढायला चढत होता. आणि बोका खाली बसून नानाला बघत होता. तेव्हड्यात चार पाच कुत्रे आले.दत्तू ही तिथे होता तो लगेच धावत गेला त्या कुत्र्यांना हकवायला,नानाही माडावरून उतरायला लागला पण त्या भिकारी कुत्र्यांनी नाना आणि दत्तू पोहचायच्या आधीच बोक्याला मारलं.नानाच्या चेहऱ्यावर त्या बोक्यामुळे आलेली चमक एका क्षणात नष्ट झाली.
दत्तू आमच्या घरी आला आणि सांगायला लागला
"सागर नानाच्या बोक्याला कुत्र्यांनी मारलं” मला तर जोरदार धक्काच बसला मी आणि साहिल धावतच नानाकडे गेलो. बोका मृत अवस्थेत पडला होता.
नाना हलक्या स्वरात बोलला चांगल्या जागी खड्डा करून ह्याला पुरा.. नानाच्या डोळ्यात खूप सारे अश्रू होते.पण लोक काय बोलतील ह्या भीतीमुळे ते डोळ्याबाहेर येत नव्हते.
मग साहिल आणि दत्तूने खड्डा खणून त्या बोक्याला पुरले.
मग संध्याकाळी आम्ही दरवेळी प्रमाणे cricket खेळून घरी येत होतो.जेव्हा आम्ही cricket खेळून घरी येत असू तेव्हा नाना आणि त्येचा बोका दरवाज्यावर राहुन काकीची वाट बघत असत. पण आज दृश्य वेगळं होत नाना तिथे एकटाच होता... जणू तो जुन्या आठवणींना जागृत करून मनातच रडत होता....
🤘एव्हड प्राणी प्रेम मी पहिल्यांदाच पाहिलं होतं🙄
Writer
सागर सावंत