ZoyaPatel
Ahmedabad

भुताच्या गोष्टी

 New Youtube Video

Instagram



                                      भुतांच्या गोष्टी

(सदर कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे.भूत, प्रेत ह्यांना आम्ही मानत नाही)


कोकणी माणूस आणि भुताच्या गोष्टी ह्यांच नात खूप जवळच आहे.कधी  summer Holidays मध्ये  मुंबई मधून सगळे मित्र नातेवाईक आल्यावर.रात्री सगळे एकसाथ बसतात सुख दुःख share करतात आणि काही creative लोक share करतात त्यांच्यासोबत घडलेली Horror story.

 ती खरी असते की खोटी ती काय आपल्याला माहीत नाही,पण त्या गोष्टी ऐकायला मज्जा येते.आणि ते story सांगणारे एवढं मन लावून ती story सांगतात ना की प्रत्येक क्षणाला  curiosity  वाढत जाते पुढे काय झालं असेल...

 पण त्यात काही लोक अशी पण असतात त्यांना माहीत असत हे खोट आहे.मग काय ते गालातल्या गालात हसत असतात.


अश्याच काही मी ऐकलेल्या कथा तुम्हाला सांगतो.

(येथे आम्ही,मी हे शब्द आलेले आहेत पण तो मी नाही)




.रात्रीची वेळ होती आम्ही घरी येण्यासाठी निघालो होतो.रस्त्यावर कोणतीही गाडी दिसत नव्हती आणि खिडकीच्या बाहेर बघायची हिम्मत होत नव्हती.

कारण इथे होणाऱ्या विचित्र आणि भयानक घटनांबद्दल आम्ही ऐकून होतो.

कधी एकदा घरी पोहोचतो अस झालेलं.त्या दिवशी अमावस्येची रात्र  नव्हती तरीपण सगळीकडे अमावस्येच्या रात्रीसारखा काळोख पसरला होता.असाच प्रवास चालला होता की तेव्हड्यात अचानक दोन मुली एकदम असा 

makeup करून रस्त्यावर उभ्या राहून आम्हाला थांबायला सांगत होत्या.

पण आम्ही काय थांबलो नाही कारण गाडीत कोणाला बसायला जागाच नव्हती... 

आम्ही थोडं पुढे गेलो आणि तिथे एक गाव लागला एव्हड्या रात्री तिथे एक Hotel चालू होतं.एका मित्राने सांगितलं खूप भूक लागली आहे कायतरी जाऊन तिथे खाऊया. आम्ही सगळे तयार झालो कारण सगळ्यांना भूक लागलेली..hotel मध्ये आलो तर एका मित्राने hotel मालकाला सहज विचारलं काय हो काका इथे कुठे लग्न आहे का... ते काका बोलले नाही का रे?...मित्राने सांगितलं  की आम्ही ह्या रस्त्यावरून येत असताना रस्त्यावर दोन नटलेल्या  मुली दिसल्या लग्नामधून आल्यासारख्या दिसत होत्या..Hotel मालक हे ऐकून थोडे घाबरले आणि मोठे डोळे करून बोलले,काय!

  आम्ही बोललो काय झालं काका घाबरताय कशाला? ते काका बोलले अरे त्या रस्ताच्या आजूबाजूला घर गाव काही नाही आहे तिथे जंगल आहे फक्त.


 हा मग काय त्यांची गाडी बंद पडली असेल म्हणून थांबल्या असतील.


 त्यावर ते काका बोलले अरे दोन वर्षांपूर्वी ह्याच रस्त्यावर लग्नामधून येत असताना दोन मुलींचा अपघातात मृत्यू झालेला.

 हे ऐकल्यांनातर माझी आणि माझ्या मित्रांची हालत गंभिर झाली.पण आम्ही घाबरलो नाही कारण आम्ही भुतांना मानत नाही. आणि ते सांगणारे खोट बोलत असतील तर.

🤣


Writer

Sagar Sawant



Mumbai
Kolkata
Bangalore
Previous Post Next Post